B.E. / B. Tech. Admission 2024: इंजीनीरिंग प्रवेश-प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध
मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठीच्या B.E. / B. Tech. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाने अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
प्रवेश-प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे:
ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणे:
तारीख: 14 जुलै 2024 ते 24 जुलै 2024
विद्यार्थ्यांना https://fe2024.mahacet.org/StaticPages/HomePage?tms=27 अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागेल.
दस्तऐवज पडताळणी आणि अर्ज पुष्टीकरणाची प्रक्रिया (Documents Verification and Confirmation of Application Form for Admission by Online Mode)
महाराष्ट्र राज्य/ऑल इंडिया उमेदवारांसाठी ई-स्क्रूटनी प्रक्रिया (E-Scrutiny Mode):
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा व मूळ कागदपत्रे स्कॅन करून आवश्यक कागदपत्रे कोणत्याही इंटरनेट-कनेक्टेड संगणक/स्मार्टफोनवरून अपलोड करावीत.
- उमेदवारांना ई-स्क्रूटनी केंद्राला भेट देण्याची गरज नाही. त्यांचा अर्ज आणि कागदपत्रे ई-स्क्रूटनी केंद्राद्वारे पडताळणी आणि पुष्टीकरण केले जातील.
- ई-स्क्रूटनी दरम्यान:
- चूक नसल्यास: अर्जाची पडताळणी व पुष्टीकरणाची स्थिती उमेदवाराच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल.
- चूक असल्यास: चुकांची माहिती उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमधून मिळेल.
- अर्ज दुरुस्ती: उमेदवारांनी त्रुटी सुधारून अर्ज पुन्हा सादर करावा.
फिजिकल स्क्रूटनी प्रक्रिया (Physical Scrutiny Mode):
- उमेदवारांनी स्वतः निवडलेल्या सुविधा केंद्राला दिलेल्या वेळेत भेट द्यावी व आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे.
- पडताळणी आणि पुष्टीकरण झाल्यानंतर, सुविधा केंद्राकडून पावती मिळेल.
NRI/PIO/OCI/CIWGC/FN आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशातील स्थलांतरित उमेदवारांसाठी:
- ऑनलाईन भरलेला आणि सादर केलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत हाती/स्पीड पोस्ट/कोरियरद्वारे “Director, Sardar Patel College of Engineering (SPCE), Versova Road, Munshi Nagar, Andheri (West), Mumbai- 400058” येथे पाठवावी.
विद्यार्थ्यांनी सर्व टप्पे वेळेत पूर्ण करून प्रवेश प्रक्रियेचे पालन करावे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनांचे पालन करा. इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!